Share

Gulabrao Patil | राजीनाम्यावरुन महाभारत! उद्धव ठाकरे गटाच्या आरोपांना गुलाबराव पाटलांचं साडेतोड उत्तर, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुका काही दिवसांवर येऊन ठपल्या आहेत. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने सत्ताधाकरांवर आरोप केले आहेत. यावरुनच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमाप्रमाणे मंजूर होईल. राजीनामा दिल्यावर मुख्यमंत्री किंवा मंत्री त्यामध्ये लक्ष घालतात, असं कुठे असतं का. त्याची एक प्रक्रिया अस प्रोसिजरमध्ये राजीनामा दिल्यानंतर मंजूर करण्याचे काह नियम असतील. नियमांप्रमाणे राजीनामा मंजूर होईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच काही नाही झालं की सरकारवर बोट दाखवायचं एवढंच काम राहिलंय दुसरं काही काम राहिलेलं नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

काही वेळापुर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या ऋतुजा लटके शिवसेनेतील नेत्यांसोबत महापालिकेमध्ये गेल्या होत्या. यावेळी आजच आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती लटकेंनी केली होती. मात्र, महापालिकेने ही विनंती फेटाळत राजीनामा देखील फेटाळला आहे. अंधेरी पोटनिवडणुकींच्या (Andheri-by Election) पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु होती. अशातच राजीनामा फेटाळल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात धाव घेऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!