Share

ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच, उदयनराजेंचा टोला

Published On: 

सातारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या भेटीसाठी उपस्थित होते.

दरम्यान, जवळपास ४५ मिनिटे ही भेटीसाठी निर्धारीत करण्यात आली होती. परंतु, जवळपास पावणे दोन तास ही बैठक सुरू होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अशोक चव्हाण, अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. या भेटीनंतर ठाकरे व मोदी यांची वैयक्तिक वेगळी भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पत्रकार परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंनी या भेटीची कबुली दिली आहे.

या बैठकीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केलीय. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच घेतल्याचं उदनयराजे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलावणं, चर्चा करणं गरजेचं होतं. मुख्यमंत्र्यांनी ते का केलं नाही? असा सवाल उदनयराजे यांनी विचारलाय. हे भेट म्हणून देवाणघेवाणीतून सत्तांतर होण्यासाठीच असल्याची टीकाही उदयनराजेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!