Share

“पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन

Published On: 

परभणी: हक्काचा पीकविमा दाबून ठेवणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, पीक विम्याची रक्कम द्या यासह अन्य घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून सोडला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

परभणीत आज भाजपाद्वारे पीकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतक-यांना पीकविम्याची हक्काची रक्कम संबंधीत रिलायन्स कंपनी व राज्य सरकारने पेरणीपुर्व तातडीने वितरीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी या संदर्भातील माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या राक्कामेसाठी वणवण करावी लागत आहे तसेच रिलायन्स कंपनी व राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा त्यांना पेरणीच्या आधी परत करावा, अशी मागणी यावेळी भाजपकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!