मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात रोष वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मात्र, या भेटीवर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. या भेटीमध्ये अनेक विषयात मराठा आरक्षण हा एक विषय होता मात्र, अद्याप राज्य सरकारने या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल का केली नाही? असा प्रश्न भाजप नेते नीलेश राणे यांनी उपस्थित केलाय.
या संदर्भात नीलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आघाडी सरकारवर टीका केलीय. यामध्ये ते म्हणाले की, ‘मराठा समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी साहेबांना फक्त मराठा आरक्षणासाठी भेटलेले नाही. त्या भेटीमागे ७ ते ८ विषय होते त्यातला एक विषय मराठा आरक्षणाचा होता. एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?? सांगावं.’
मराठा आरक्षण प्रश्नावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जातोय. त्यातच पदोन्नतीमधील आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय समोर आलाय. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झालीय. त्यात आता राज्य सरकार हा विषय केंद्र सरकारकडे टोलवण्याचा प्रयत्न करतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल
- सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही – उद्धव ठाकरे
- संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
- महापौरांचा 100% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई – आशिष शेलार
- ‘संजय राऊत बोलले नाहीत तर त्यांना पगार मिळेल का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
