Share

मराठा मोर्चाची दिशा ठरणार, आज होणार संभाजीराजे-उदयनराजे भेट !

Published On: 

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटणार आहेत. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तिघांच्या वेळा घेतल्यानंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा आता उदयनराजे हे संभाजीराजेंच्या पाठीशी उभा राहणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!