इंग्लंड : आयसीसीच्या पहिल्या वहिल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे ४ दिवस बाकी आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये असुन पुर्णपणे तयार झाले आहेत. या सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे.
साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीत सर्वांचं लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असेल. गिलनं त्याच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. तसेच तो आयपीएल आणि टीम इंडियाचा लवकर कॅप्टन होईल असा दावा देखील दिग्गजांनी केला आहे. गिलनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त एकदा पहिल्या बॉलचा सामना केला आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या अहमदाबाद टेस्टमध्ये पहिला बॉल खेळला होता. त्यावेळी जेम्स अँडरसननं त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये इनस्विंगरवर LBW केले होते. गिलला त्या इनिंगमध्ये खातही उघडता आले नाही.
त्याने ‘द ग्रेड क्रिकेटर शो’ मध्ये त्याबद्दल सांगितलं आहे. त्या इनिंगच्या सुरुवातीला मी स्वत: रोहित शर्माला पहिला बॉल खेळवतो, असं सांगितलं होतं. ते मी का केलं हे माहिती नाही. पण त्यावेळी मी तिसऱ्या की चौथ्या बॉलवर शुन्यावर आऊट झालो. त्यामुळे आता पुन्हा असं होणार नाही.” असं गिलनं म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दगडूशेठ’ गणपतीला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ५०० डाळिंबांचा नैवेद्य !
- डब्ल्युडब्ल्युईचा ‘जॉन’ निघाला ‘विराट’चा फॅन ; शेअर केला फोटो
- ‘…तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे’ ; अजिंक्य रहाणेने दिल्या बॅट्समनना टिप्स
- औरंगाबादेत आता ‘या’ खड्डेमय रस्त्यांचे भाग्य उजळणार, मनपाकडून डांबरीकरणाची तयारी सुरु!
- शासनाची अशीही काटकसर, खाद्यतेलाचे भाव वाढल्याने पोषण आहारात तेलाऐवजी साखर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

