Share

कर्णधाराच्या अनुपस्थितीत न्युझीलंडने इंग्लंडविरुद्ध मिळवलेला विजय; भारतासाठी धोक्याची घंटा

Published On: 

मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

या विजयासह न्युझीलंडचा संघ भारताविरुद्ध होणाऱ्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी किती तयार आहे याची प्रचिती आली. प्रमुख खेळाडुंच्या अनुपस्थितीत न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमित कसोटी सामन्यात ४ दिवसात नमवले. त्यांचा हा विजय भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. तसेही डब्ल्युटीसी स्पर्धेत भारतीय संघाचा न्युझीलंडने २-० असा दारुण पराभव केला होता. त्यामुळे न्युझीलंडच्या संघाचा अत्मविश्वास भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी चागंलाच दुणावलेला आसेल.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत न्युझीलंडसंघाचे सर्वच खेळाडू भन्नाट फॉर्मात दिसले. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या डेवॉन कॉनवेने द्विशतक झळकावले. त्याला हेन्री निकोलसने चांगली साथ दिली. तर दुसऱ्या कसोटीत अनुभवी खेळाडू रॉस टेलरने फॉर्मात परत आल्याचे संकेत दिले. दुसऱ्या सामन्यात ट्रेंट बोल्टने शानदार पुनरागमन केले. त्याला एजाज पटेल, मॅट हेन्री यांनी पुरेपुर साथ दिली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत न्युझीलंडच्या संघाने पुरेपुर सराव करुन घेतला आहे आणि ते आता अंतिम लढ्यासाठी सज्ज आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!