Share

‘उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या नावाचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी करू नका !’

Published On: 

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

सध्या प. बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु असताना दुसरीकडे तामिल्नादुम्द्ये देखील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी एका सभेत बोलताना द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे असे धक्कादायक आरोप त्यांनी केले आहेत. एका वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

मात्र यांनतर या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. यावेळी बांसुरी स्वराज म्हणाल्या की, ‘उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या नावाचा उपयोग आपल्या निवडणूक प्रचारासाठी करू नका! आपली विधाने खोटी आहेत! पंतप्रधान नरेंद्रामोदि यांनी माझ्या आईला अत्यंत आदर आणि सन्मान दिला. आमच्या सर्वात कठीण काळात पंतप्रधान आणि पार्टी आमच्या बाजूने जोरदार उभे राहिले! मात्र तुमच्या या वक्तव्याने आम्ही दुखावले आहोत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!