मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी कसोटी मालिकेत भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा जाम खूश झाले होते. त्यांनी भारतीय टीममधील सहा तरुण खेळाडूंना महिंद्रा थार SUV देण्याची घोषणा केली होती.
आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना आपल्या कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR गिफ्ट म्हणून देत असल्याचे जाहीर केले होते. महिंद्रांनी मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि नवदिप सैनी या सहा खेळाडूंना थार गिफ्ट देणार होते. ही एसयूव्ही टीम इंडियाच्या तरुण खेळाडूंना गिफ्ट करताना मला खूप आनंद होत असल्याचे महिंद्रा म्हणाले होते.
Playing cricket for India is the biggest privilege of my life. My #Rise has been on an unusual path. Along the way, the love and affection, I have received has overwhelmed me. The support and encouragement from wonderful people, helps me find ways to #ExploreTheImpossible ..1/2 pic.twitter.com/FvuPKljjtu
— Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
भारतातील मोठे व्यावसायिक असलेल्या आनंद महिंद्रा यांनी आपले वचन पूर्ण करत टी नटराजनला ‘थार एसयूव्ही’ कार भेट दिली आहे. त्यानंतर नटराजननेही महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना एक खास रिटर्न गिफ्ट दिले आहे. नटराजनला त्याची थार मिळाली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती शेअर करत महिंद्रांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर नटराजनने रिटर्न गिफ्ट म्हणून गॅबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी स्वाक्षरी करुन महिंद्रा यांच्यासाठी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘…जर कोहलीला विश्रांती हवी होती तर त्याने सांगायला हवे’


