मुंबई : देशातल्या आठ राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत कोविड-19 च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत असून एकंदर बाधितांपैकी 84 टक्क्यांहून अधिक नवबाधित याच आठ राज्यातले असल्याचं आढळून आलं आहे.
महाराष्ट्रात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोना पुन्हा डोके वर काढत असून परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. अनेक रुग्ण आता विविध कारणांसाठी झगडताना पाहायला मिळत आहेत.राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत.अशातच, पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सामान्यांसह उद्योजकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात अंधेरीमधील ओशिवरा भागात दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी आंदोलन केलं आहे.राज्यात लॉकडाऊन लावण्याला केवळ विरोधी पक्षच नव्हे तर, सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडूनही विरोध होत आहे.
सरकारने लॉकडाऊन लावू नये, या मागणीसाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी श्रीजी हॉटेलसमोर आंदोलन केले. नागरिक ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या अंतर्गत काळजी घेऊन वावरत आहेत. वाटल्यास नियम कठोर करा, पण लॉकडाऊन लावू नका, अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ तालुक्यात आजपासून १० दिवस कडक जनता कर्फ्यु…
- ‘सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याज कपातीसंदर्भातील माहिती मिळाली असावी’
- चेन्नईला या सत्रातही संघर्ष करावा लागणार; आकाश चोप्राचे मोठे भाष्य
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

