मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले असुन जवळपास सर्व संघाचे सराव शिबीर सुरु झाले आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलची स्पर्धा ही युएईमध्ये भरवण्यात आली होती. युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पर्धेचा प्रमुख संघ म्हणून समजला जाणारा संघ चेन्नई सुपर किंग्सची कामगीरी निराशाजनक राहिली होती. यदांच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईचा संघ कशी कामगीरी करतो याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार चेन्नईच्या संघाला या सत्रातही संघर्ष करावा लागणार आहे. याचे मुख्य कारण सांगताना आकास चोप्रा म्हणाला की, चेन्नईच्या संघातील बहुतेक खेळाडू हे बऱ्याच कालावधीपासून क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्यांचा संघर्ष अटळ आहे. मात्र इतर संघातील खेळाडू हे क्रिकेट खेळत असल्याने त्यांना संघर्ष कमी करावा लागेल किंवा करावा लागणार नाही.
या संघातील सुरेश रैना, अंबाती रायडू, कर्णधार महेंद्रसिंह धोनी मागील अनेक दिवसापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेले नाहीत. यात संघाचा महत्वाचा खेळाडू रविंद्र जडेजाही दुखापतीमुळे आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतूराज गायकवाड दोघांनी घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असल्याने हे दोघे खेळू शकतात. तसेच रैना बराच काळ खेळला नसल्याने मला वाटते की, सीएसकेचा संघ या हंगामात संघर्ष करताना दिसणार आहे.’ तसेच या संघातील शेन वॉटसनही गेल्या वर्षी नंतर निवृत्त झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ तालुक्यात आजपासून १० दिवस कडक जनता कर्फ्यु…
- ‘सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याज कपातीसंदर्भातील माहिती मिळाली असावी’
- ‘थलाइवा यांचे अभिनंदन’, दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रजनीकांत यांचं मोदींकडून अभिनंदन
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

