🕒 1 min read
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद सर्व जगभर उमटत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्याने राजधानी कीवसह प्रमुख शहरे लष्करी हल्ल्यांखाली आली आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zhelensky) यांनी खंत व्यक्त केली आहे.
“आम्हाला युद्धात एकटं पाडण्यात आलं. आमच्या बाजूने लढण्यासाठी कोण उभे राहणार आहे? मला एकही देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाहीये.”, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
दरम्यान रशियाने युक्रेन लष्कराचे ७४ तळ उद्ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या ११ तळांचा समावेश आहे. तर दुसरीकडे रशियाची ६ लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीव्हपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे सैन्य काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
राऊत, परबांनी केली तयारी; ईडी पोहोचली यशवंत जाधवांच्या घरी- अतुल भातखळकर
-
‘युक्रेन रशियाच्या युद्धात भारताची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती’ – पृथ्वीराज चव्हाण
-
IND vs SL : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर ईशान किशनचे दमदार कमबॅक ; धोनीलाही मागे सोडले
-
IND vs SL : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर ईशान किशनचे दमदार कमबॅक ; धोनीलाही मागे सोडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
