Share

…अन्यथा संघर्ष अटळ ! उदयनराजे भोसले यांचा वीज वितरण कंपनीला थेट इशारा

Published On: 

सातारा : कोरोना महामारीमुळे वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळित आहे. कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांचीच तारेवरची कसरत करत आहेत. आज वीजपुरवठा अत्यावश्‍यक असून, कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. अशा स्थितीत वीज जोडणी अत्यावश्यक आहे. पण वीजबिलांच्या थकबाकीमुळे कनेक्‍शन तोडण्याची कारवाई वीज कंपनीकडून होत आहे. हा प्रकार निश्‍चितच वेदनादायी असून टप्प्याटप्प्याने रक्‍कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे.

दिल्लीसारख्या राज्यात वीजबिल काही युनिटपर्यंत पूर्णपणे माफ आहे. तेथे शेतकऱ्यांना ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखील खूप कमी आहेत, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, वीज वितरण कंपनी देशात अग्रेसर राहिली आहे. कोरोना काळातही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठाही सुरळीत राहिला. महाराष्ट्रातील विजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होते.

सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही विजेवर अवलंबून आहेत. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळातील तीन-चार महिन्यांची वीजबिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन गडबडले आहे. एकत्रित वीजबिल दिल्याने एकूण युनिटचा दर लागला आहे. यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे.

अशा परिस्थितीत थकीत वीजबिल टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला हवा. याबाबत धोरणात्मक निर्णय मंडळाने घेतला पाहिजे. कोरोनासारख्या महामारीत वीजबिल थकबाकीमुळे वीज कनेक्‍शन तोडण्याची कारवाई होणार असेल. तर ते जनता कदापि मान्य करणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहणार आहोत, तसेच कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन त्याचा जागेवरच सोक्ष मोक्ष लावताना संघर्ष अटळ असेल, असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!