बीड : बीड शहरातील हॉटेल व्यवसायिक पान टपरी छोटे छोटे उद्योग व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुट देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या जाचक अटीतुन बाहेर काढून त्यांना इतर व्यापाऱ्यांन प्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. अगोदरच गेल्या वर्षींच्या लॉकडॉऊनमुळे छोट्या व्यवसायिकांची व कामगारांची कंबरडे मोडले आहे. त्यात आपण छोट्या व्यावसायिकांसाठी जाचक अटी टाकून त्यांच्या समस्यात आणखीन वाढ केली आहे. तरीही जिल्हाधिकारी हॉटेल पान टपरी छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना सोशल डिस्टन्सचे नियम पाळून त्यांना इतर व्यापान्यांप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आपल्या कार्यालयाकडून मिळावी.
तसेच लग्न समारंभासाठी नियम व अटी लाऊन मंगल कार्यालय फिक्शन हॉल हे सुरू करावेत जेणेकरुन यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे हाल होणार नाहीत. त्यासाठी आपणास हे निवेदन सादर करण्यात येत आहे नसता वंचित बहुजन आघाडी बीड शहरामध्ये सर्व हॉटेल पान टपरी छोट्या व्यवसायिकांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

