Share

गौहर खान विरोधात एफआयआर दाखल ; गौहरच्या टीमने केला खुलासा, म्हणाले…

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेने एफआयआर दाखल केली होती.

झाले असे की, गौहरवर आरोप आहे की, तिला कोरोनाची लागण झाली आहे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जेव्हा बीएमसीचे अधिकारी गौहर खानच्या घरी तपासणीसाठी पोहोचले तेव्हा ती तेथे सापडली नाही.त्याचवेळी, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी सांगितले की, गौहर खान यांच्याविरुध्द ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, 269, 270, 51 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

यादरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेने एफआयआर दाखल केली होती. आता या प्रकरणी तिच्या टीमकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. गौहर खानच्या टीमने अभिनेत्रीचे स्टेटमेंट प्रदर्शित करत प्रतिक्रिया दिली आहे. यात म्हटले आहे की, गौहर खानला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. इथे त्यांचा लेटेस्ट रिपोर्ट आहे. त्यांचे सर्व प्रकारच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्या नियमांचे पालन करणाऱ्या नागरिक आहेत आणि मुंबई महानगर पालिकेच्या सर्व कायद्यांना त्या सहयोग करत आहेत. सर्वांना विनंती आहे आता या तर्कवितर्कांना पूर्णविराम लावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!