Share

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन लवकरच येणार भारत भेटीला

Published On: 

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन एप्रिल अखेर भारत भेटीवर येणार असल्याची माहिती ब्रिटन पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी देण्यात आली आहे. जॉन्सन यांचा युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यावर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असल्याचे नमूद केले आहे. या भेटीत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चीनच्या आक्रमक हल्लचालींना आवर घालण्यासाठी कोणती कडक पावले उचलली जावीत, याविषयी चर्चा होणार असल्याचे समजत आहे. ब्रिटन आणि चीन यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. त्यामुळे जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यावर चीनची बारीक नजर असल्याचेही सांगितले जात आहे.

यंदाच्या भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोरीस जॉन्सन यांना पंतप्रधान मोदी यांनी आमंत्रित केले होते. ते आमंत्रण जॉन्सन यांनी स्वीकारले देखील होते. तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतात येण्यास उत्सुक असल्याचे ही त्यांनी म्हटले होते. परंतु त्यावेळी ब्रिटन मध्ये कोरोनाचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात झाल्याने जॉन्सन यांनी भारत भेट रद्द केली होती. आता जून मध्ये होणाऱ्या जी ७ समिट पूर्वी जॉन्सन भारतात येत आहेत. कारण जून मध्ये होणाऱ्या जी ७ समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनला जाणार आहेत.

युरोपियन युनियनमधून बाहेर आल्यानंतर बोरिस जॉन्सन आता ब्रिटनसाठी नवीन शक्यतांचा शोध घेत आहेत. बर्‍याच मुद्द्यांवरून चीन आणि युकेचे मतभेद झालेले आहेत. अशा स्थितीत भारतासोबत बोरिस जॉन्सन हे उभे आहेत. त्यामुळे ही भेट खूप महत्त्वाची समजली जात आहे. या भेटीतून पुढे आणखी काही बाबी समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!