Share

MNS | “मातोश्री-2 कशी उभारली?”, मनसेच्या ‘या’ नेत्याच्या सवालाने खळबळ

Published On: 

MNS | मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज अपार्टमेंटवरून कालच्या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मनसे (MNS) नेता प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्रीवर सवाल उपस्थित केला आहे.

यावेळी, सुषमा अंधारेंनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, मातोश्री 2 कशी उभी राहिली, हे स्पष्ट करावं, असं प्रकाश महाजान म्हणाले. तसेच माझे नेते राज ठाकरे हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचं नाही, असं देखी महाजन यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे यांनी विचार करून बोलावं. त्यांच्या मालकाला विचारून बोलावं. माझे नेते शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. सगळे कर भरतात. टोपल्याखाली झाकून काही करत नाहीत, असं देखील महाजन म्हणाले.

दरम्यान, मुंबईत वांद्रे येथील कलानगर येथे मातोश्री बंगल्यात उद्धव ठाकरे यांचं निवास्थान आहे. याच मातोश्रीवरून शिवसेना पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. 2019 मध्ये या इमारतीशेजारीच आठ मजली मातोश्री 2 ही इमारत बांधण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच वर्षी ही इमारत उभी राहिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!