Sanjay Raut | नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली
संजय राऊत म्हणाले, “काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असं होतं नाही. ४० नेते गेले तरी, पक्ष जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल.”
पुढे ते म्हणाले, जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. उद्या ह्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना लोकं गद्दारांची नातेवाईक म्हणतील, अशी खोचक टीकाही संजय राऊतांनी शिंदे गटावर केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “मोदींना रावण म्हंटल्यावर गुजरातचा अपमान होतोय तर…”, संजय राऊत भडकले
- Vijay Hazare Trophy 2022 | पुण्याचा स्टार चमकला, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये ऋतुराजचे शानदार शतक
- Freddy | ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर बघता येईल कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’
- Eknath Shinde | “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”; शिंदे गटाची काव्यमय टीका
- Sushma Andhare | महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार? सुषमा अंधारे म्हणाल्या…


