Sanjay Raut | नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री शिंदे-भाजप सरकारच्या तोंडावर थुंकत आहेत. कर्नाटकने जत ला सोडलेल्या पाण्याब बुडून मरा, असे राऊत म्हणाले. मोदींना रावण म्हटल्यावर गुजरातचा अपमान होतो. मग शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहीजे. स्वाभिमान असेल तर जलसमाधी घ्यावी. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर तुम्ही शिवसेना सोडली, आता तो स्वाभिमान कुठे गेला. कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतो आहे.”
“यांच्या (शिंदे गटातील आमदार) कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. दिवार चित्रपटात अमिताभच्या हातावर होते, मेरा बाप चोर है. तसे यांचे नातेवाईक, यांचे पोर, यांच्या बायका, हे म्हणतील. लोक म्हणतील हे गद्दार आहेत. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरु आहे. तुमची क्रांती कुठ आहे? क्रांतीची वांती झाली का?. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मला आदर आहे. गुजरातच्या एका प्रचारसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी भाषणाच्या ओघात नरेंद्र मोदी हे शंभर तोंडाचे रावण आहेत का?, असे म्हटले होते. त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपुत्राताचा अपमान आहे. पण महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान होऊन भाजप आणि शिंदे गट गप्प बसला आहे. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?. भाजपच्या विचारातील हा फरक समजून घ्यायला हवा”, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “मोदींना रावण म्हंटल्यावर गुजरातचा अपमान होतोय तर…”, संजय राऊत भडकले
- Vijay Hazare Trophy 2022 | पुण्याचा स्टार चमकला, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये ऋतुराजचे शानदार शतक
- Freddy | ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर बघता येईल कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’
- Eknath Shinde | “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”; शिंदे गटाची काव्यमय टीका
- Sushma Andhare | महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार? सुषमा अंधारे म्हणाल्या…


