Share

शिवसेनेचे दोन आणि एक भाजपचा आमदार असलेल्या औरंगाबाद शहरात रविवारी ‘शून्य’ लसीकरण

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असल्यास त्याला लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. असे असतांना औरंगाबाद शहरातील लसीकरणाने अद्याप वेग घेतलेला नाही. विशेष म्हणजे रविवारी औरंगाबाद शहरात ‘शून्य’ नागरिकांनी लस घेतली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, लसीकरणाची हीच गती राहिली तर कोरोनाची तिसरी लाट कशी थांबवणार? त्यामुळे औरंगाबाद शहरात एक भाजपचा, दोन शिवसेनेचे आमदार असताना शहराला कोणी नेता आहे का? असा प्रश्न पडतो.

औरंगाबाद शहरात दोन खासदारांसह अर्धा डझनपेक्षा जास्त आमदार राहतात. इतर मराठवाड्यातील नेत्यांची घरे देखील इथे आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील दोन मंत्री देखील शहरातच वास्तव्याला आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेही घर शहरातच आहे. मात्र, इतके सर्व असताना शासन दरबारी औरंगाबादची बाजू मांडण्यासाठी एकही नेता पुढे आलेला नाही. दुसरीकडे राज्यात आरोग्य मंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात लसीकरणाने जोर पकडला असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ८७५८११ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यात रविवारी जिल्ह्यातील १५८० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. मात्र, हे सर्व नागरिक ग्रामीण भागातील आहेत. शहरात रविवारी एकाही नागरिकाला कोरोना लस देण्यात आली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून डॉ. महेश लड्डा यांनी कळवले आहे.

त्यामुळे औरंगाबादला सक्षम नेतृत्त्वाची कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे लसींची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ती केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यात शासन दरबारी पक्की बाजू घेण्याची कोणाचीच तयारी नसल्याने औरंगाबादकरांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी शहरातील नागरिकांसाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!