नवी दिल्ली : मोदी सरकारनं राज्यसभेत आज मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं आहे. त्यानुसार कलम 370मधील काही कलमं वगळण्यात येणार आहेत, असं अमित शाह यांनी संसदेत सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
Resolution revoking Article 370 from J&K moved in Rajya Sabha. pic.twitter.com/ayUAqJdb6o
— ANI (@ANI) August 5, 2019
भारताच्या इतिहासातील हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. हा प्रस्ताव मांडताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला विरोधकांकडन कडाडून विरोध करण्यात येत आहे. अमित शाह राज्यसभेत प्रस्ताव मांडत असताना विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली तसेच हे विधेयक मांडण्यास विरोध करण्यात आला.
Uproar in Rajya Sabha after resolution revoking Article 370 from J&K moved by Home Minister Amit Shah. pic.twitter.com/pR7UQ5QACu
— ANI (@ANI) August 5, 2019
हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी थयथयाट सुरु केला असून संसदेत गोधळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, सैन्य ज्याप्रमाणे जम्मू काश्मिरात वाढविले होते त्यावरून सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारी असल्याचे बोलले जात होते.


