Share

नांदेड विभागातून धावणार दोन नवीन साप्ताहिक व द्विसाप्ताहिक रेल्वे

Published On: 

नांदेड : रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार दोन नवीन साप्ताहिक व द्विसाप्ताहिक रेल्वे सुरू होणार आहेत. तिरुपती-श्रीसाईनगर शिर्डी-तिरुपती आणि कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर या रेल्वे नांदेड रेल्वे विभागातून धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.

तिरुपती-श्रीसाईनगर शिर्डी-तिरुपती रेल्वे
तिरुपती-श्री साईनगर शिर्डी साप्ताहिक (०७४१७ ) विशेष एक्स्प्रेस ६ एप्रिलपासून तिरुपती येथून दर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि गुंटकल, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे श्री साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. श्री साईनगर शिर्डी -तिरुपती-साप्ताहिक (०७४१८) विशेष एक्स्प्रेस ७ एप्रिलपासून श्री साईनगर शिर्डी येथून दर बुधवारी रात्री ७.३५ वाजता सुटेल. तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल.

कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर रेल्वे
कोल्हापूर ते नागपूर (०१४०४) द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १२ मार्चपासून कोल्हापूर येथून दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोलामार्गे नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल. नागपूर ते कोल्हापूर (०१४०३) द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १३ मार्चपासून नागपूर येथून दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!