Share

आरोग्य विभागाच्या परिक्षेत हेराफेरी करणारे आणखी दोघे गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत हेराफेरी केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलिसानी आणखी दोन जणांना शनिवारी रात्री अटक केली. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींची संख्याही १३ पर्यंत पोहचली आहे. अमोल भगवान बडुगे (वय २४, रा. कुन्हा  (काकोडा) ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) आणि कमलसिंग लालचंद नायमने (वय २३, रा. जोडवाडी ता.जि. औरंगाबाद) अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे असून त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी रविवारी (दि.३०) दिले.

अमोल बडुगे हा परिक्षार्थी होता, त्याचे परिक्षा केंद्र नाशिक येथे होते. त्याला राहुल बहुरे हा बडुगे याला मोबाइलव्दारे उत्तरे पुरवीत होता. तर नायमाने हा देखील गेवराई येथील धनश्री कॉलेजमध्ये परिक्षा देणारा आरोपी मदन बहुरे याला मोबाइलव्दारे उत्तरे सांगत होता. गेवराई तांडा येथील धनश्री महाविद्यालयात सुरु असलेल्या परिक्षेत उमेदवारांना पेपर सोडविण्यासाठी मदत करित असल्याची माहिती चिकलठाणा पोलीसांना मिळाली होती.

पोलिसांनी छापा मारुन सहा आरोपींना अटक केली. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातयापूर्वी मदन बहुरे, राहुल बहुरे, फुल बेग, रमेश बमनावत, संतोष रगडे, स्वप्नील बाहेकर, अकाश नागलोत, पवन कवाळे, अर्जून बिघोत, सचिन जंघाळे आणि योगेश सुलाने या ११ आरोपींना अटक करण्यात आली. तर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!