Share

मुलींची विक्री करणा-या टोळीतील आणखी दोघांना अटक

Published On: 

🕒 1 min read

जालना:गेल्या काही दिवसांपासून मुलींची विक्री करणारी टोळी महाराष्ट्रभर सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.मुली विकणा-या टोळीतील दोघांना जळगावमधुन पोलिसांनी काल रात्री अटक केली असून ही टोळी राज्यभरात कार्यरत असल्याचा पोलिसांचा कयास खरा ठरला आहे.

जालन्यात आपल्याकडे कामासाठी येणा-या आठरा वर्षाच्या मुलीला पोलिस क्वॉर्टरमध्ये राहणा-या एका महिलेने 18 ऑगस्ट 2017 ला महिलेने फुस लावुन राजस्थानमध्ये सुजितकुमार मोतीलाल लोहार या इसमास अडीच लाखाला विकले होते या माणसाने आठ दिवस त्या मुलीवर बलात्कार केला होता.मुलीच्या पालकांनी मुलीला सदर महिलेनेच गायब केल्याचा संशय व्यक्त केला होता त्यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता सदर महिलेला अटक केल्यानंतर राजस्थानातील वृषभदेव (ता. खेरवाडा, जि. उदयपूर) येथून लोहार याला अटक केली. सदर मुलीची सुटका केल्यानंतर जालना पोलिसांनी आता जळगाव जिल्हयातील पहूर पोलिसांच्या मदतीने वाकोद येथील सुरेश शिवारे व दुस-या एका ठिकाणावरून सुभाष भोई या दोघांना अटक केली. या प्रकरणात आणखी दोघे आरोपी असून मुलींची विक्री करणारी ही टोळी महाराष्ट्रभर असल्याचा संशय खरा ठरत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!