Share

‘विडी, यंत्रमाग व बांधकाम व इतर कामगारांना दोन महिन्यांचे धान्य सवलतीच्या दरात उपलब्ध होणार’

Published On: 

सोलापूर : संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठा प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू केली आहे, हे अतिशय गरजेचे होते. परंतु सोलापूर शहरात मोठा प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार व बांधकाम कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. राज्यभरात संचारबंदी लागू केली असल्याने सोलापूर शहरातील विडी उद्योग, यंत्रमाग उद्योग व बांधकाम व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या कामगारांना रोजचा पगार न मिळाल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे रोजंदारीवर काम करणाज्या विडी व यंत्रमाग व बांधकाम उद्योगातील कामगारांध्ना शासनामार्फत मोफत अन्नधाध्न्य वितरण करण्याची मागणी केली. तसेच याबाबत मा. सचिव अन्न व नागरी पुरवठा श्री. खंडारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यावेळेस श्री. खंडारे यांनी राज्यातील सर्व अंत्योदय योजनेतील व केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना माहे मे 2020 व जून 2020 चे अन्नधान्य सवलतीच्या दरात अडव्हान्स स्वरुपात मिळणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्यामुळे सर्व रोजंदारीवर उदरनिर्वाह असणाज्या कामगारांध्ना सवलतीच्या दरात अन्नधाध्न्य मिळणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.तसेच जर कोणत्याही कामगारांना रेशन दुकानातून अन्नधान्य मिळण्यास काही अडचण निर्माण होत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!