Share

…अन्यथा बैलगाडीसह विधान भवनावर मोर्चा काढणार ; पडळकरांचा इशारा

Published On: 

आटपाडी : आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या आणि पोलिसांच्या मोठ्या विरोधानंतरही अखेर बैलगाडी शर्यत यशस्वी करून दाखवली. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही असा शासनाचा प्रयत्न होता तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकरानी घेतला होता. त्याप्रमाणेच आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन बैलगाडा शर्यत यशस्वी करून दाखवली.

यानंतर पडळकरांनी इशारा दिला आहे. ‘सरकारने बैलगाडी शर्यतीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा बैलगाडीसह विधान भवनावर मोर्चा काढणार’ असा इशारा आता पडळकरांनी राज्य सरकारला दिला आहे. ही शर्यत होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनही सज्ज झाले होते. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे. यानंतर त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून त्यांनी आता पुढचा मोर्चा हा विधान भवनावर काढणार असल्याची घोषणा केली आहे.

आटपाडी तालुक्यातील निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर सकाळी शर्यती पार पडल्या. पडळकर यांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवत बैलगाडा शर्यत पार करून दाखवली. न्यायालयाने बंदी घातली असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार केल्या आहेत. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही शर्यती पार पडल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!