Share

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ५ तालुक्यांत १३ ऑगस्टपासून संचारबंदी लागू

Published On: 

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला या पाच तालुक्यांत १३ ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा जिल्हा प्रशासनानं निर्णय घेतला आहे.

या निर्णयाला व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला असून काल यासंदर्भात आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. संचारबंदी निर्णयाच्या विरोधात मंगळवारपासून ३ दिवस आंदोलन करण्याचा या बैठकीत निर्णय झाला.दरम्यान, आमदार समाधान अवताडे यांनीही व्यापाऱ्यांची भेट घेतली. लवकरच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

आषाढी वारीसह अनेक धार्मिक सोहळे रद्द केल्यानं अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यातच आता संचारबंदीचा आदेश काढल्यानं हातावर पोट असलेल्या व्यावसायिक आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच करमाळा आणि सांगोल्यात याविषयावर आज व्यापाऱ्यांची बैठक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!