Share

बैलगाडी शर्यतीसाठी निघालेल्या सदाभाऊ खोतांना पोलिसांनी अडवले

Published On: 

सांगली : बैलगाडी शर्यतीस जात असतांना पोलिसांकडून स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांना अडविण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत ट्विट च्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच इथे शेतकरी नाही तर अफगाणिस्तानातून आतंकवादी या शर्यतीत येणार आहेत की काय असे वाटत असल्याचेही सदाभाऊ म्हणाले.

दरम्यान, सदाभाऊ यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की ,’आटपाडी तालुक्यातील झरे या गावामध्ये २० ऑगस्ट २०२१ रोजी होणाऱ्या छकडा गाडी शर्यतीसाठी जात असतांना झरे गावाच्या आधीच पोलिसांकडून आम्हाला अडविले. छकडा गाडी शर्यत रोखण्याकरीता महविकास आघाडी सरकार कडून प्रत्येक स्तरांवरून अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत.

तसेच आटपाडी तालुका व जवळील चार ते पाच तालुक्यांमध्ये सरकारने कडकनाका-बंदी सोबत संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लावली आहे. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहून असे वाटते आहे जसे उद्या तिथे शेतकरी न्हवे तर अफगाणिस्तानातून आतंकवादी या शर्यतीत भाग घेण्यासाठी येणार आहेत. असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!