Share

लाल परी बदलतेय : एसटीच्या ताफ्यात लवकरच दोनशे ई – बसेस होणार दाखल

Published On: 

पुणे – पर्यावरणपुरक वाहतूकीला चालना देण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीत इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवण्यात येत आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या ताफ्यातही ई-बसेस दाखल होणार आहे. एसटी प्रशासनाकडून दोनशे ई – बसेससाठीची निविदा प्रसिध्द करण्यात आली असून लवकरच या बसेस ताफ्यात दाखल होतील. या सर्व बसेस भाडेतत्वावरील असणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

एसटी प्रशासनाकडून २०० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. ई-वाहनांना प्रोत्साहन म्हणून त्यातील ५० बससाठी केंद्र सरकार अनुदान देणार आहे. काही महिन्यांत या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर सुरवातीला कमी अंतराच्या मार्गावर त्या सोडण्यात येतील. यानंतर या बसेसची तांत्रिक क्षमता तपासून त्या २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या मार्गावर पाठविण्यात येणार असल्याचे देओल यांनी स्पष्ट केले. मुंबई विभागासह राज्यातील उर्वरीत एसटीच्या आगारात टप्या टप्याने या बसेस दाखल होणार आहेत. सर्व ई-बस वातानुकूलीत असणार असून भाडेतत्वावर त्या चालवण्यात येणार आहेत.

सध्या राज्य परिवहन (एसटी) ताफ्यात वातानूकील प्रवासासाठी शिवनेरी, शिवशाही बसेस उपलब्ध आहेत. मात्र, इलेक्ट्रीक बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर वातानूकुलीत बसेसच्या संख्येत वाढ होणार आहे. यामुळे इंधनबचत होऊन प्रदुषणही कमी होणार आहे.

पहिल्यांदाच एसटीच्या ताफ्यात ई – बसेस दाखल होत असल्याने त्याबाबत तांत्रिक अभ्यासाची गरज आहे. बसचा परफॉर्मन्स, चार्जिंग आदींबाबत माहितीसाठी सुरवातीला या बसेस जवळच्या मार्गावर सोडण्यात येतील. पुणे – मुंबई प्रवासात घाटक्षेत्र आणि काही ठिकाणी चढ – उताराचे रस्ते आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात या मार्गावर बसेस सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!