औरंगाबाद : हर्सुल सावंगी परिसरातील एका शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला. फायरब्रिगेडच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांचे मृतदेह घाटी मध्ये पाठविण्यात आले. यात मोहम्मद असलम नियाजी वय २२ रा. दिल्ली गेट औरंगाबाद, शेख साजिद शेख याकुब वय २४ रा.कैलास नगर औरंगाबाद अशी तरुणांची नावे आहे.
फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद रोडवरील हर्सुल सावंगी परिसरातील गट नंबर ८२ |२ ,मधील शेततळ्यात औरंगाबाद शहरातील दोन तरूण दि. २५ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान पोहायला गेले असता, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरूणांचा बुडुन मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
यात मोहम्मद असलम नियाजी वय २२ रा. दिल्ली गेट औरंगाबाद, शेख साजिद शेख याकुब वय २४ रा.कैलास नगर औरंगाबाद या दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. त्यांचे मृतदेह अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वर काढण्यात आले. त्यानंतर घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्यांच्या नावांची आहे सर्वाधिक चर्चा
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
