Share

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्यांच्या नावांची आहे सर्वाधिक चर्चा

Published On: 

बंगळूर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनीच स्वतः ही घोषणा केली. कर्नाटकात भाजप सरकारला नुकतंच 2 वर्ष पुर्ण झाली आहेत. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं.

सूत्रांच्या मते कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लिंगायत समाजाचे नेते मृगेश निरानी, बसवराज बोम्मई, वोक्कालिगा समाजाचे नेते अस्वथ नारायण, आर अशोक, सी टी रवी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. यातही येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढं असलेलं नाव आहे प्रल्हाद जोशी यांचं.

प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकमधून खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्यासह बीएल संतोष यांचंही नाव चर्चेत आहे. बीएल संतोष बऱ्याच वर्षांपासून भाजपचे संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावं देखील चर्चेत आहेत.

भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय समजले जातात. मुख्यमंत्रीपदाच्या बाबत बोम्मई यांनी सावध पवित्रा घेत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. याशिवाय मुरगेश निराणी हे लिंगायत समुदायातील आहेत. निराणी यांचे देखील नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!