🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या पनवेल उपजिल्हासंघटक आदिती सोनार यांनी शिवबंधन सोडून मनसेमध्ये प्रवेश केला आहे. आदिती सोनार यांच्यासह ४० ते ५० महिला कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘कृष्णकुंज’वर आदिती सोनार आणि इतर महिला कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.
शिवसेनेमध्ये महिलांची गळचेपी होते, असा गंभीर आरोप करत आदिती सोनार यांनी मनसेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेचे आणखी पदाधिकारी मनसेमध्ये येतील असा विश्वास भगत यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेत अंतर्गत राजकारण आणि प्रत्येक वेळी महिलांना डावलण्यात येतं. आपण बाळासाहेबांना मानणारे लोक आहोत. बाळासाहेबांना मानणारे आणि मराठी माणसांना मानणारे राज ठाकरेंच्या विचारधारांना प्रेरित होऊन मी मनसेमध्ये प्रवेश केला आहे, असं मत यावेळी आदिती सोनार यांनी व्यक्त केलं आहे.
शिवसेनेच्या पनवेल उपजिल्हासंघटक सौ. आदिती सोनार यांनी त्यांच्या समर्थकांसह आज मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. अतुल भगत हेसुद्धा उपस्थित होते.#मनसेप्रवेश pic.twitter.com/CSQwCLD5nY
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 7, 2021
राज ठाकरेंच्या कार्यावर विश्वास ठेऊन आज सोनार आणि कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. येत्या काळात शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत मोठा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेत असणारी नाराजी, स्थानिकांची होणारी गळचेपी यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत धूसपूसी वाढल्या आहेत, असं मत भगत यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कपाटातून चोरीला गेलेले ७ कोटी कुठून आले होते? हेही पवारांनी गवळींना विचारावं – सोमय्या
- आधी भानगडी करणारेच सरकारमध्ये होते, तर ईडी कशाला कारवाई करेल?; भाजपचं पवारांना प्रत्युत्तर
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
