मुंबई: राज्यात आणि देशभरात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजप करत आहे. मात्र यावरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी भाजपने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांना तो युट्युबवर अपलोड करण्यास सांगावे, असा सल्ला दिला आहे. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“सांड की आंख,निल बट्टे सन्नाटा या टुकार चित्रपटांना कर माफी देणारे, आपल्या सरकारच्या प्रत्येक कामाची करोडोंची जाहिरात वृत्तपत्रात देणारे अरविंद केजरीवाल द कश्मिर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यू ट्यूबवर टाकण्याचा फुकटचा सल्ला देत आहेत. हिंदूद्वेष नसानसात भिनलेले दुतोंडी गांडूळ”,अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान कश्मिरी पंडितांच्या नावावर काही लोकांनी करोडोंची कमाई केली आहे आणि तुम्ही फक्त पोस्टर लावत आहात असे केजरीवाल यांनी विधानसभेत भाजपला उद्देशून म्हटले. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, त्रिपुरा, गोवा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“परमबीर सिंह यांच्या CBI चौकशीमुळे बरेच उंदीर…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
आवडता नेता कोण विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या; “घर की मुर्गी…”
केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
आमदारांना 300 घरं देणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

