Share

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर एक केंद्र महाविद्यालयांस देण्यात आले आहे. या केंद्रात सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. परंतु नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून नेवासा तालुक्यात सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा या दोन केंद्रांना मंजुरी मिळवली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात दररोज ९०० ते १००० कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एका केंद्रावर पूर्ण तालुक्याच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कठीण होते. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशांत गडाख यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र मंजूर केले आहेत.

त्यामुळे नेवासा तालुक्यातील अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या सर्वच विभागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून जवळच अंतिम वर्षाची परीक्षा कोरोनाची काळजी घेत देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशांत गडाख यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नेवासा तालुक्यात दोन परीक्षा केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!