अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती व्यवसायाला स्वातंत्र्य, स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या विधेयकांविरोधात ज्यांनी भारत बंद पुकारला आहे तेच खरे शेतकरी विरोधी आहेत, असा घणाघाती आरोप शिंदे यांनी केला आहे. तसेच आज जे ह्या विधेयकाला विरोध करतात त्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोलाही त्यांनी लावला आहे.
संसदेत विरोधकांचा विरोध डावलून केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले असून, या कृषी विधेयकाविरोधात विविध शेतकरी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांकडून देशभर निदर्शने तसेच आंदोलने सुरु केले आहे. हे आंदोलन पुकारणाऱ्यांवर माजी मंत्री प्रा.शिंदे यांनी निशाणा साधत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अनेक दिवस प्रलंबित असणारे कृषी विधेयक मोदी सरकारने पारित केले व भारत देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली. कृषी विधेयका विरोधात देशभरात सुरु असलेले मोर्चे तसेच निदर्शने यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हा केवळ पॉलिटिकल स्टंट आहे. जे आज विरोध करतात त्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- सरकार मराठा समाजातील मुला-मुलींच्या आयुष्याशी खेळतंय – विनायक मेटे
- शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
- कांद्याच्या निर्यात बंदीने पाकिस्तानचा आर्थिक फायदा; सामनातून मोदी सरकारवर सडकून टीका
- पैसासाठी अडवणूक करणार्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा, राजेश टोपेंची प्रतिक्रिया
- चक्क कोरोनाबाधित रुग्णच शिरला आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आणि मग…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

