नागपूर : खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून, अशी अडवणूक करणार्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्यसुविधा अधिक बळकट करण्यासोबतच ऑक्सिजन सुविधाच्या खाटांचे प्रमाण वाढवावे. शहरातील खासगी व शासकीय कोविडसाठी राखीव रुग्णालयांनी वैद्यकीय व्यवस्थेचे क्षमतावर्धन करावे.
उपलब्ध मनुष्यबळ व सुविधा यांची योग्य ती सांगड घालून कोविडमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. आयुक्तालयात आयोजित बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, महापौर संदीप जोशी, खासदार कृपाल तुमाने यासह आमदार विकास कुंभारे, समीर मेघे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सुधाकर शिंदे, अर्चना पाटील, आयएमएचे अध्यक्ष संजय देवतळे, अर्चना कोठारी यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरातील अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान (संस्था )एम्स या संस्थेने ५00 खाटा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ६00 ऐवजी १ हजार खाटांची क्षमता विकसित करण्याचे निर्देश दिले. टेस्टिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवून सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनला प्रोत्साहन देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड व रेल्वेचे हॉस्पिटलही पूर्ण क्षमतेने वापरण्याची सूचना त्यांनी केली. कोविड उपचार करणार्या रुग्णालयांमध्ये उपचारांचे दरपत्रक व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत असल्याची माहिती देणे बंधनकारक आहे.
प्लाज्मा थेरेपीचे काम मेडिकलमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगून टोपे म्हणाले, मृत्यू दर कमी करणे हेच आपले लक्ष असले तरी ब्रॉट डेथचे प्रमाण अधिक आहे म्हणून नागरिकांनी लक्षणे आढळल्यास लवकर हॉस्पिटल गाठावे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सेवा पुणे मुबंई येथे न घेता नागपुरातच उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे विधान
- मुंडे आणा नाहीतर आणखी कोणीही आणा मला फरक पडत नाही – देवेंद्र फडणवीस
- सरकार मराठा समाजातील मुला-मुलींच्या आयुष्याशी खेळतंय – विनायक मेटे
- शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
- कांद्याच्या निर्यात बंदीने पाकिस्तानचा आर्थिक फायदा; सामनातून मोदी सरकारवर सडकून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

