लखीमपूर : उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खीरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला पोलिसांनी आज, शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाने स्थितीदर्शक अहवाल मागवला आहे. तसेच याला अनुसरून सातपैकी दोन आरोपींची गुरुवारी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक झाली असून, लवकुश आणि आशीष पांडे अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील सात आरोपींमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशीष मिश्रा याचा समावेश आहे. त्याला शुक्रवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका गाडीत आशीष होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु अजय मिश्रा यांनी हा आरोप फेटाळला आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना दोन रिकामी काडतुसे सापडली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी उपमहानिरिक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांचे पथक तयार करण्यात असल्याचे देखील यावेळी पोलिसांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राहुलची वादळी खेळी, पंजाबचा चेन्नईवर दणदणीत विजय पण…
- अजित दादा मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला गेले अन् धरणाच्या मधोमध अडकले
- ‘लखीमपूर हिंसाचारामुळे महाराष्ट्रात होत असलेला बंद जड जातोय की..’
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

