🕒 1 min read
पुणे: मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून काल गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. काल सकाळपासून आयकर विभागाची पथके यावर तपास करत आहेत. आता यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्या व्यक्तीबाबत शंका असल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. मात्र अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधाऱ्यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तर तपास यंत्रणांचा गैरवापर आणखी किती काळ सहन करायचा, हे आता नागरिकांनी ठरवावे, असा सवालही शरद पवार यांनी केला आहे.
दरम्यान आता या प्रकरणावर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर निशाना साधला आहे. इन्कम टॅक्स,ईडी या सरकारी यंत्रणांचा वापर करत काडी पेटवून सत्तेची शिडी चढण्याचे स्वप्न भाजपने निदान महाराष्ट्रात तरी बघू नये. लखीमपूर हिंसाचारामुळे महाराष्ट्रात होत असलेला लाक्षणिक बंद जड जातोय की NCB च्या धाडीत भाजप नेत्यांचा समावेश समोर आल्यामुळे हे प्रकरण जड जातंय?असा खोचक सवाल करत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राहुलची वादळी खेळी, पंजाबचा चेन्नईवर दणदणीत विजय पण…
- अजित दादा मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला गेले अन् धरणाच्या मधोमध अडकले
- ‘लखीमपूर हिंसाचारामुळे महाराष्ट्रात होत असलेला बंद जड जातोय की..’
- ‘मिशन कवच कुंडल’; लातूर जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिम
- आर्यन खानच्या अडचणी आणखी वाढल्या, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
