Share

अजित दादा मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला गेले अन् धरणाच्या मधोमध अडकले

Published On: 

पुणे: पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला निघाले होते. पण तराफ्याचे इंजिन बंद पडले.अन् ते धरणाच्या मधोमध अडकले. अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका असे अगोदरच म्हटले होते. आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला.

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरण येथे मत्स्यव्यवसायाची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. याठिकाणी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचे होते. मात्र यावेळी गरजेपेक्षा अधिक लोक बसले आणि यामुळे तराफ्याचे इंजिन बंद पडले.

यानंतर इंजिन सुरू करण्यासाठी चालकाने प्रयत्न सुरू केले. यासाठी मत्स्यव्यवसायाचे मालकही झटू लागले. शेवटी शेजारच्या बोटीला जवळ बोलविण्यात आलं, दादा त्यात बसले आणि पिंजऱ्यावर पोहचले. पाहणी आणि माहिती घेऊन दादा परत निघाले तेंव्हा येथील पर्यटन म्हणजे खूप कसरत घ्यावी लागते अशी मिश्किल टिपण्णी अजित पवारांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!