🕒 1 min read
पुणे: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्यांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या आरोपात मनीष भानूशालीचे नाव घेतले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. महत्वाचे म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली आणि त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली आहे.आता यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
इन्कम टॅक्स,ईडी या सरकारी यंत्रणांचा वापर करत काडी पेटवून सत्तेची शिडी चढण्याचे स्वप्न भाजपने निदान महाराष्ट्रात तरी बघू नये. लखीमपूर हिंसाचारामुळे महाराष्ट्रात होत असलेला लाक्षणिक बंद जड जातोय की NCB च्या धाडीत भाजप नेत्यांचा समावेश समोर आल्यामुळे हे प्रकरण जड जातंय?असा खोचक सवाल करत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1446162614229213208
दरम्यान अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
