मुंबई – कोरोनाच्या संकटकाळात एका बाजूला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबाबत डॉक्टर सल्ला देत आहेत. नागरिक देखील विविध पर्यायांचा अवलंब करत असून दुधाचा देखील वापर वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याच दुधामध्ये भेसळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबईतील वर्सोवा भागात दुधामध्ये भेसळ करण्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने वर्सोवा भागात छापा टाकत भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधून दूध काढून टाकल्यानंतर, तेवढेच पाणी मिसळून विक्री करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेने याठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली आहे.
या छाप्यात सुमारे २९४ लिटर भेसळयुक्त दूधही जप्त केले आहे.यामध्ये मदर डेअरी, अमुल आणि गोकुळच्या दुधाचा बॅगचा समावेश होता. दुधाच्या बॅगेतून दूध काढून रिकाम्या बॅगेमध्ये पाणी आणि दूध मिक्स करण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता अशी माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामंतांना माहितीये भाजपचं पुन्हा येणार, त्यामुळेच ते…’; निलेश राणेंच्या व्हिडीओने खळबळ
- पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट; 29 तारखेला भारतीय सैन्यात होणार दाखल
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- ७ मे चा निर्णय हा असंवैधानिक; ‘त्या’ जीआरवरून काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर
- सकारात्मक : पुण्यात सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत


