Share

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट; 29 तारखेला भारतीय सैन्यात होणार दाखल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- २०१९ साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे अवघा देश हादरला होता. या हल्ल्याच्या आठवणीने अनेकांच्या अंगावर आजही काटा येतो. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या मार्फत केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवानांना वीरमरण प्राप्त झाले.

या हल्ल्यानंतर काही दिवसानंतर पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल हे शहीद झाले. उल्लेखनीय बाब मृत्यू येण्याच्या आगोदर काही महिने म्हणजे केवळ ९ महिन्यांपूर्वीच विभूती यांचे लग्न झाले होते. पतीच्या अश्या पद्धतीने जाण्यामुळे सर्वसामान्य महिला खचून गेली असती मात्र या वीर जवानाची वीरपत्नी असणाऱ्या नितिका कौल धौंडीयाल  या खचून  गेल्या नाहीत.

निकिता यांनी मेजर धौंडीयाल यांचं बलिदान निकिता यांनी व्यर्थ जाऊ दिलं नाही आणि पतीच्या जाण्याचं दुःख विसरून त्यांनी स्वतः भारतीय सैन्यात दाखल होण्याचा धाडसी निर्णय घेतला. पतीच्या निधनाच्या सहा महिन्यानंतर निकिता यांनी Short Service Commission (SSC) चा फॉर्म भरला आणि त्या परिक्षेत उत्तीर्णही झाल्या.

Services Selection Board (SSB) त्यांची मुलाखतही घेतली आहे. त्यानंतर चेन्नईत त्यांनी Officers Training Academy (OTA) प्रशिक्षण घेतलं आणि आता २९ मे २०२१ ला त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल म्हणून रुजू होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!