🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अहवाल दिला आहे की जगभरातील सरकारे ट्विटरला युझर्सच्या अकाउंटवरील काही ट्विट किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीची हेरगिरी करण्यास सांगत आहेत. ट्विटर कंपनीने गुरुवारी आपल्या नवीन पारदर्शकता अहवालात (ट्रांसपरंसी रिपोर्ट) जाहीर केले आहे की जुलै-डिसेंबर 2021 दरम्यान पत्रकार, वृत्तवाहिन्या आणि वृत्त संकेतस्थळांनी ट्विटरवर पोस्ट केलेली माहिती (ट्विट) काढून टाकण्यासाठी जागतिक स्तरावर भारताने सर्वाधिक कायदेशीर मागण्या केल्या आहेत.
ट्विटरने या अहवालात म्हटले आहे की, ट्विटर अकाउंटची माहिती मिळविण्यात भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वात जास्त म्हणजे 19 टक्के मागण्या अमेरिकेतून आल्या होत्या. ज्यात अकाउंट वरील वैयक्तिक माहिती मागण्यात आली होती. ट्विटरने म्हटले आहे की जगभरातील 349 पत्रकार आणि वृत्तवाहिन्याच्या अकाउंटवरून करण्यात आलेले ट्विट काढून टाकण्यासाठी कायदेशीर मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जानेवारी 2021 ते जून 2021 या कालावधीत 103 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अहवालानुसार, भारताने 114, तुर्कीने 78, रशियाने 55 आणि पाकिस्तानने 48 कायदेशीर मागण्या केल्या आहेत. जानेवारी ते जून 2021 मध्ये भारत या यादीत अव्वल होता. भारताने केलेल्या कायदेशीर मागण्यांची माहिती देताना ट्विटरने सांगितले की, जुलै-डिसेंबर 2021 दरम्यान ट्विट काढून टाकण्यासाठी जगभरात एकूण 47,572 मागण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३,९९२ (८%) विनंत्या भारतातून होत्या. यामध्ये 23 न्यायालयीन आदेश आणि 3,969 इतर कायदेशीर मागण्यांचा समावेश आहे. यादरम्यान ट्विटरने भारतात 88 अकाउंट आणि 303 ट्विटवर बंदी घातली होती.
अमेरिकेकडून 20 टक्के मागणी
या अहवालानुसार, सर्वाधिक 20 टक्के मागण्या अमेरिकेतून आल्या होत्या, ज्यामध्ये अकाउंटची माहिती मागविण्यात आली होती. तर एकूण जागतिक मागण्यांपैकी19 टक्के मागण्या भारतातून आल्या होत्या. ट्विटरवरून पोस्ट काढून टाकणाऱ्या किंवा अकाउंटची माहिती मागणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये जपान, फ्रान्स आणि जर्मनीही आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- T20 World Cup साठी टीम इंडिया फायनल! रोहित म्हणाला, “काही स्लॉट रिकामे आहेत, पण…”
- Chhagan Bhujbal and Sharad Pawar | OBC आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि छगन भुजबळांची पत्रकार परिषद
- Bengal SSC Scam । …आणि ईडीच्या चौकशीत अर्पिता मुखर्जी ढसाढसा रडू लागली
- IND vs WI T20 : टीम इंडियात दमदार फलंदाजाची अचानक एंट्री, तरीही रोहितला वेस्ट इंडिजची भीती!
- Eknath Shinde’s banner torn | छगन भुजबळांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
