Share

‘मोदी सरकारच्या इशाऱ्यावर ट्विटरने आमचे अकाऊंट लॉक केले, मात्र त्यांना आम्ही भीक घालत नाही’

Published On: 

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटरचे खाते निलंबित करण्यात आल्यामुळे देशात काँग्रेससह विरोधकांनी चांगलेच रान पेटवल्याचे दिसून आले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉम असणाऱ्या ट्विटरने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आणि काही नेत्यांचे अकाऊंट लॉक केले होते. सुमारे आठवडाभर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे खाते देखील तात्काळ बंद करण्यात आल्यानंतर आता ट्विटरने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसला दिलासा दिला आहे.

आज सकाळी राहुल गांधी यांच्यासह अन्य नेते व काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाउंट्स पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसने ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट करून लढ्याला यश आल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे देखील अकाऊंट आता पूर्ववत झाले असून त्यांनी ट्विट करत ट्विटरसह मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘मोदी सरकारच्या इशाऱ्यावर ट्विटरने राहुल गांधी यांच्यासह आमचे हँडल लॉक केले होते. हा भारताची लोकशाही आणि नागरिकांच्या विचारस्वातंत्र्यावरील हल्ला आहे. अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. लोकशाही, संविधान आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही यापुढे अधिक आक्रमकपणे आवाज उठवू!,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!