🕒 1 min read
बीड : अमेरिकेत नोकरी निमित्त वास्तव्याला असलेल्या अंबाजोगाईतील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला होता. त्यांच्या मृत्युबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, अमेरिकेतील वृत्तमाध्यमांनी पोलिसांच्या हवाल्याने धक्कादायक माहिती प्रकाशित केली आहे. पतीनेच पत्नीचा खून करून स्वत:ला संपवल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमांनी केला आहे.
बालाजी रुद्रवार आणि त्यांची पत्नी आरती रुद्वार हे अमेरिकेतील न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन येथे राहत होते. बालाजी आणि आरती यांना चार वर्षाची एक मुलगी असून आरती या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. अमेरिकेतील मीडियाच्या माहितीनुसार, बालाजी यांनीच आरतीचा खून केला आहे. बालाजीने आरतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरती जेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी पळत होती, तेव्हा त्याने आरतीच्या पोटात चाकू खुपसला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आरतीने जागेवरच तडफडत जीव सोडल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला. पत्नीला मारल्यानंतर बालाजीनेही स्वत:ला संपवल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या कथित खूनाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच या दोघांचा मृत्यू कसा झाला हे सांगता येईल असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. बालाजी आणि आरती यांचे मृतदेह मिळण्यात ८ ते १० दिवस लागतील असे पोलिसांनी सांगितले.
व्यापारी भारत रुद्रवार यांच्या मोठा मुलगा बालाजी २०१४ मध्ये अमेरिकेत गेला. सोनपेठ येथील मुलीशी विवाहानंतर २०१५ मध्ये बालाजी (३२) व पत्नी आरती (३०) अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांना एक मुलगी (विहा) झाली. हे दांपत्य अमेरिकेतील न्यू जर्सीमधील अर्लिंगटन भागात राहत होते. आरती पुन्हा गर्भवती होती. ११ मार्च २०२१ रोजी तिच्या आई-वडिलांनी तिला मुंबईपर्यंत नेऊन अमेरिकेच्या विमानात बसवले होते. गुरुवारी सकाळी पोलिसांनी दांपत्याचा मृत्यू झाल्याचे कळवले. मृत्यूचे गूढ मात्र कायम आहे. अंबाजोगाई शहरात भारत रुद्रवार यांचे मोंढ्यात दुकान असून बालाजी त्यांचा मोठा मुलगा होता. दुसरा मुलगा रिलायन्स कंपनीत आहे. तिसऱ्या मुलाचे शहरातच मेडिकल आहे.
महत्वाच्या बातम्या
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
