मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा धोका काही कमी झाला नाही, तर कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा धोका देखील वैद्यकीय तज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे हे निर्बंध अजून वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावर आता महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक आणि कोरोना विरुद्धच्या लढाई साठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच विजय मिळवू, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणू जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला तेंव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या आणि मग त्या कशा वाढत गेल्या त्याची माहिती देतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह्रुदयी नेतृत्वाची आणि त्यांच्या कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धत याचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाला, वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.
मास्क, सेनिटायझर आणि सतत हात धूणे या गोष्टी अतीशय सोप्या शब्दांत समजावून सांगतांना डॉ. तात्याराव लहाने यांनी आजही पन्नास टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे सांगून यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद केले. दोन जण चहा प्यायला गेले तर आधी एकाने मास्क काढून चहा प्यावा, जेवण एकत्र घ्या पण एकाने जेवा तोवर दुसऱ्याने तोंडावर मास्क राहू द्यावा, असे आळीपाळीने चहा -भोजनाचे सेवन करता येते. आपण घरातून बाहेर पडल्यावर शर्ट पँट काढतो कां ? नाही नां ? तसेच मास्क हाही आता आपल्या कपड्यांबरोबरचा अविभाज्य भाग झाला आहे. तोंड आणि नाक झाकून योग्य पद्धतीने मास्क वापरला आणि स्वच्छता, अंतर व्यवस्थित राखले तर कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणून तिसरी लाट थोपविण्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, पैसे मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशीन्स
- नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी! पैशासाठी विवाहितेचा छळ
- भारतातील कोरोना इतर देशांसाठी गंभीर, आयएमएफचा चिंताजनक अहवाल
- पैठणच्या नाकारोडवरील ढाब्यावर पोलिसांचा छापा ! देशी-विदेशी दारु जप्त


