🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यामुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मात्र सध्या ती एका व्हिडीमुळे चर्चेत आली असून नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली आहे.
दरम्यान ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटामुळे चर्चेत असलेली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिला बघून फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर सरसावले. त्यानंतर तिची वेगवेगळया पोजमधील फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल ही झाले आहेत. यानंतर तिच्या फोटोमुळे तिला नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. तर काही नेटकऱ्यांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे रश्मिकाचे कपडे पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
अलिकडेच मुंबई एअरपोर्टवर रश्मिका व्हाईट कलरची हुडी व शॉर्ट्स आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसली. नेटकऱ्यांनी लूक कूल,पँट घालायला विसरल्या का? इतके छोटे कपडे घालून मिरवतात, यांना थंडी वाजत नाही का?तुझा लूक कूल वाटला अशी कमेंट केली. तर बऱ्याच जणांनी रश्मिकाचा फॅशन सेन्स पाहून तिला ट्रोल ही केलं आहे. रश्मिका सध्या ‘पुष्पा’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुन व रश्मिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
https://www.instagram.com/reel/CZE6zA7Fqmv/?utm_source=ig_web_copy_link
‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून अभिनेत्री रश्मिका मंदाना कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अलिकडचे प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटात तिने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. सध्या रश्मिका दाक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय.
एका रिपोर्टनुसार, रश्मिका ३० कोटी रूपयांच्या संपत्तीची मालकीण असून बेंगळुरूमध्ये तिचा ८ कोटींचा व्हिला आहे. अलिशान गाड्या आहेत. रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रटातही ती झळकणार असल्याने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरतेय.
महत्त्वाच्या बातम्या
-
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “कोण चौथ्या नंबर ला…”
-
तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर
-
‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
