नाशिक – महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे /धार्मिक स्थळे बंद केल्यामुळे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने आंदोलनांची राळ उठवली होती त्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा मंदिरे ,धार्मिकस्थळे बंद करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ज्यांची उपजीविका धार्मिक स्थळांवर अवलंबून आहे अशा लाखो छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत होते. म्हणुनच भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीद्वारे मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा आंदोलने सुरू करण्यात आली. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर, वेरुळ येथे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी साधु-संतासह रुद्राभिषेक करून आंदोलन केले होते. त्यानंतर शेवटच्या श्रावण सोमवारी दि.३० ऑगस्ट रोजी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याची घोषणा केल्याने भाजप आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकच्या रामकुंडावर गोदामाईची आरती करुन साधु-महंतांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल आदि. उपस्थित होते.
यावेळी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले, आमच्या आवाहनानंतर राज्यभरातल्या भाविक जनतेने रस्त्यावर उतरत शंखनाद आंदोलन केले. आमचा हा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी तर घुमलाच पण त्यांच्या पितरांपर्यंत जाऊन पोहोचला आणि पितृपक्ष असल्याने हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खडसावून सांगितले, की महाराष्ट्रात सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या नादाला लागून देवी-देवतांना बंदिस्त करुन ठेवण्याचा जो अधर्म सुरु आहे तो बंद करा आणि तातडीने मंदिरे उघडा. म्हणुनच ठाकरे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या आमच्या संघर्षाला अखेर यश आलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक


