म्यानमार: गेल्या माहिनाभारापूर्वी 1 फेब्रुवारीला म्यानमार या देशात लष्कराने राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवून टाकत लष्करी राजवट लागू केली आहे. मात्र तेथील जनता या राजवटीचा विरोध करत असून माहिनाभारापासून आंदोलने सुरु असून लष्कराडून आंदोलने रोखण्यासाठी हिसंक मार्ग अवलंबत आहे.
यामध्ये शनिवारी म्यानमारमध्ये लष्कर दिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी बर्मा येथे आयोजित एका लष्करी कार्यक्रमाच्या स्थळी आंदोलन कर्त्यांनी मोठा मोर्चा काढला व देशातील लष्करी राजवटीला विरोध दर्शवला. आतापर्यंत आंदोलनकर्ते व लष्करामध्ये झालेल्या हिंसाचारात 400 हून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यावेळी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात एकट्या शनिवारी 91 जणांचा मृत्यू झाला. याआधी 14 मार्चला एकाच दिवशी 74 जणांचा मृत्यू झाला होता. लष्कराच्या या राजवटीविरोधात आता सामान्य जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारीही उतरले आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे तर काही पोलीस हे भारतात देखील घुसले आहेत. म्यानमार माऊ या न्यूज वेबसाईटने ही बातमी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अबब! तब्बल सहा वर्षांपासून पाणीपट्टी न भरता धरणातून पाणी उपसा
- केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा दिले शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचे संकेत
- आयपीएलमध्ये स्टोक्स पासून सावध रहा !, जॉस बटलरचा इशारा
- बीड जिल्ह्यात कोविड सेंटर हाऊसफुल्ल!
- एका लग्नाची अजब गोष्ट ; नवरीमुलीनेचं घातलं नवऱ्यामुलाला मंगळसूत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

