Share

तुळजापूर आरोग्य केंद्र; वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद तर कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. वाढता कहर लक्षात घेता, संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्यातच जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रात मनमानी कारभार चालू असल्याचे दिसून आले. तालुक्यातील मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुंड हे रुग्णालयात उपस्थित न राहता स्वत:च्या निवासस्थानी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना सोमवारी दुपारी निदर्शनास आली. तुळजापूर पंसचे अधिकारी श्री. राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून पाहणी केली असता ते अनुपस्थित असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. मंगरूळ आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषीविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मंगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी बाळांतपणासाठी महिला आली होती. यावेळी आरोग्य केंद्रात डॉ. पुंड हे उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस तुळजापूर येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

सोमवारी उपसरपंच महेश डोंगरे, शाम पाटील, आदम फकीर, सौदागर जाधव, विजय गरगडे, ग्रामसेवक एन. के. सुरवसे व ग्रामस्थ दु. १२ वा. आरोग्य केंद्रात आले असता डॉ. पुंड उपस्थित नसल्याचे दिसून आले. यावेळी ते निवासस्थानी असल्याचे सांगण्यात आले. तसेच महिला डॉक्टरही रजा न देता गैरहजर होत्या.उपसरपंच डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ डॉ. पुंड यांच्या निवासस्थानी गेले असता ते मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी अनेकवेळा अनुउपस्थित असतात.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!